होली स्पिरीट शाळेमधील विद्यार्थ्यांच्या पालकांची पालक-परिषद आज संपन्न

लोणी कंद, २८ जानेवारी २०२१: सदरच्या सभेसाठी विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. जवळजवळ १८०० विद्यार्थी असणाऱ्या होली स्पिरिट लोणीकंद पालक संघाची पहिल्यांदाच पालक परिषद आयोजित करण्यात आली होती, यामध्ये पालक परिषदेचे अध्यक्षपद प्रदीप भाऊ कंद यांना देण्यात आले होते.

याप्रसंगी प्रदीप कंद यांनी पालक सभेला संबोधित करताना म्हणाले की, “परिसरात नावाजलेल्या असणाऱ्या ‘होली स्पिरीट’ शाळेमध्ये शेतकरी, मध्यम वर्गीय तसेच कामगार वर्गाच्या ग्रामीण भागातील पालकांची मुले त्या शाळेमध्ये शिकतात व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज प्रत्येक समस्यांना प्रत्येकजण तोंड देत आहे.

या संकटांना तोंड देत असताना शाळेकडून कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या बाबतीत असणारी अपेक्षा या सर्वांचा समन्वय साधण्यासाठी होली स्पिरिटच्या पालकांची पालक संघ स्थापन करत आहोत. या पालक सभेच्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थ्यांचे शाळेचे पालकांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडविण्याचा शुद्ध प्रयत्न या पालक संघाच्या माध्यमातून करण्यात येथील असे बोलताना प्रदीप कंद यांनी सांगितले आहे.

यावेळी पालक संघाची स्थापना करण्यात आली. यामध्ये परिसरातील पालकांची उपस्थिती ही मोठया प्रमाणात होती, पालक संघातील प्रमुख पालक प्रतिनिधी म्हणून सचिन दरेकर, वैभव पवार, दिगंबर भावनेर, अशोक दरेकर, सचिन शिवले, योगेश भोंडवे, प्रताप दरेकर यांची निवड करण्यात आली.

यावेळी उपस्थित रोहिणीताई वाळके, सागर तळेकर, विजय वाळुंज, रुपेश गावडे, दशरथ फराटे, मनोज शिंदे, गणेश झुरुंगे, राहुल झुरुंगे, सचिन शिंदे, दत्ता झुरुंगे, सुनील कंद, सतीश शिंगणे, श्रीकांत कंद हे उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा