मुंबई, २७ ऑगस्ट २०२०: काही दिवसांपूर्वी महाड मध्ये ५ मजली इमारत कोसळली आणि त्यानंतर आज मुंबईच्या नागपाडा क्षेत्रामध्ये इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या अहवालानुसार आज दुपारी १ च्या सुमारास नागपाडा भागातील एका इमारतीचा भाग कोसळला. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ४ जण अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. तसेच या दुर्घटनेमध्ये तीन जण जखमी झाले आहेत.
या आधीही मुंबईच्या फोर्ट परिसरात जुलै महिन्यात एक इमारत कोसळली होती आणि त्यानंतर मालाडच्या मालवणी परिसरात इमारतीचा भाग कोसळला होता. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल भागातील पाच मजली भानुशाली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे.
नागपाडा भागात बचाव क्षेत्राचे कार्य सुरू असून अग्निशमन दलाचे जवान कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ३ जण जखमी आहेत आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे