परतीच्या पावसाने मिरची उत्पादक ‘लाल’

पुणे: राज्यात लांबलेला परतीचा पाऊस. त्याचा फटका लाल मिरचीला बसला आहे. त्यामुळे काही ठिकाणी मिरचीचे
मोठे नुकसान झाले आहे. तर, काही ठिकाणी माल भिजल्यामुळे त्याचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे लाल मिरची अजूनच ‘तिखट’ बनली आहे.
लाल मिरचीचा बाजारात तुटवडा निर्माण झाल्याने मागील १० दिवसांत घाऊक बाजारात क्विंटलच्या भावात २००० ते २५०० हजार रुपयांनी वाढ झाली आहे. तर, किरकोळ बाजारात किलोमागे तब्बल ४० रुपयांनी भाव वधारले आहेत. बेडगी मिरची तब्बल १७५ ते २०० रुपये प्रतिकिलो इतकी झाली आहे. त्यामुळे मिरची चांगलीच लाल झाल्याचे पहायला मिळत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा