टेंभुर्णी, २१ जुलै २०२० : महाराष्ट्रभर सर्व तालुक्यातून संघटनेच्या माध्यमातून कवडीमोल भाव मिळत असणार्या दुधाला विकून पण एक रुपयाचाही फायदा होत नाही, त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी व युवाशक्तीने माढा तालुक्यातील शिराळ येथील युवकांनी टेंभुर्णी येथे मोफत दूध वाटून गांधीगीरी मार्गाने आंदोलन केले आहे.
गेली तीन-चार महिन्यांपासून कोरोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच शेतकऱ्यांचा प्रमुख जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय ओळखला जातो त्यावर किती तरी कुटुंब रोजचा उदरनिर्वाह करत आहेत. उत्पादन खर्चाच्या तुलनेत दुधाला भाव मिळत नसल्यामुळे दूध धंदा तोट्यात आहे आणि हा धंदा पुढे करायचा का नाही या निर्णयावर शेतकरी येऊन थांबला आहे..
तरी केंद्र सरकार व राज्य सरकारने या दूध धंद्याला टिकवण्यासाठी अनुदान व इतर उपाययोजनांचा त्यांना लाभ द्यावा.
सीलबंद पाणी बाटली पेक्षाही दुधाचा दर कमी झालेला आहे.तरी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावर दूध ओतून न देता गोरगरिबांना ते मोफत वाटले आहे.
याप्रसंगी माढा तालुका अध्यक्ष शुभम लोकरे, दूध उत्पादक शेतकरी उमेश चव्हाण, सुधीर लोकरे, अमोल मुळे, आप्पा चव्हाण, सुरज देशमुख, राजू चव्हाण उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील