गोल पोस्ट महाराष्ट्र दहाव्या गोवा लघुपट महोत्सवात ‘पाषाण’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी लघुपट

दहाव्या गोवा लघुपट महोत्सवात ‘पाषाण’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी लघुपट

८ नोव्हेंबर २०२३ : दहाव्या गोवा लघुपट महोत्सवात गार्गी प्रॉडक्शन निर्मित “पाषाण” या लघुपटाला सर्वोत्कृष्ट मराठी लघुपटाचा बहुमान मिळाला आहे. पणजी येथील संस्कृतीभवनात पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन रहेमान पठाण यांनी केले आहे तर निर्माते गणेश काकडे आहेत. या लघुपटाद्वारे, अडगळीत असलेला विषय चांगल्या प्रकारे रसिकांसमोर आल्यामुळे त्याची सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या लघुपटामध्ये ग्रामीण भागातील जीवन आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करण्यात आले असून लहान मुलाच्या मनातील अस्वस्थता ही अतिशय उत्तम पद्धतीने मांडण्यात आली आहे. यावेळी लघुपटाचे निर्माते गणेश काकडे व दिग्दर्शक रहेमान पठाण म्हणाले, की मराठी चित्रपट सृष्टीत नवनवीन प्रयोग करण्याचे काम करत असून सामाजिक विषय घेऊन गार्गी प्रॉडक्शनच्या माध्यमातून ‘पाषाण’ या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या लघुपटाचे चित्रीकरण अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा फाटा व नागापूर या ठिकाणी झाले असून या लघुपटाच्या चित्रीकरणा दरम्यान गावकऱ्यांनी मोठे सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.

या लघुपटात अभिनेते राजकुमार तांगडे, कांचन काकडे, बालकलाकार आयुष देवकर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तर वेदांत काकडे, हर्ष सोसे, ज्ञानेश जाधव, बाबा बेलापुरकर यांनी सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. या लघुपटाचे सहाय्यक चैतन्य साळुंके, पार्श्वसंगीत राजु चांदगुडे तर प्रमोद आगडे, उदय गायकवाड, विजय शिंदे, बंडू हिप्परगे, किरण गायकवाड, महेश नाईक, यांनी तांत्रिक बाजू सांभाळली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार

error: Content is protected !!
Exit mobile version