जर तुमचा पासवर्ड एखाद्या हॅकर्सकडून चोरी केल्यास Google यासंबंधी मदत करणार आहे. त्यामुळे युजर्सला रियल टाइम पासवर्ड प्रोटेक्शन मिळणार असून कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागणार नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
गुगल पासवर्ड मॅनेजर अॅन्ड्रॉइड व क्रोमसोबत सिंक केलेला असतो. आता कंपनीने Password Checkup हे नवे फिचर आणले आहे. हे फिचर इनबिल्ट असणार आहे.
पासवर्ड चेकअप फिचरमुळे आपला अकाउंट पासवर्ड हॅक केला आहे की नाही ते गुगलकडून सांगितले जाणार आहे. तसेच आपण Low टाईप पासवर्ड ठेवत असल्यास त्या संदर्भातही आपणास कळवले जाणार आहे.
सध्या गुगल क्रोममध्ये बिल्ट इन पासवर्ड चेक अप दिल्याने पासवर्ड हॅक होण्याविषयी चिंता करण्याची गरज नाही. कंपनीने हे फिचर टूल सिक्युरिटी इश्यू संबंधित लॉन्च केले आहे.
गुगलने अकाउंटमध्येच चेकअप ऑप्शन दिले आहे. त्यावरुन आपला पासवर्ड हॅक झाल्याचे समजणार आहे. Password.google.com येथून तुम्हाला अॅक्सेस करता येणार आहे.