गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई पशुसंवर्धन विभागाची परीक्षा पुन्हा लांबणीवर

पशुसंवर्धन विभागाची परीक्षा पुन्हा लांबणीवर

मुंबई : महाराष्ट्रामध्ये महापोर्टलद्वारा घेतल्या जाणार्‍या परीक्षांमध्ये तांत्रिक त्रुटी आढळून येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पशुसंवर्धन विभागातील पदभरती परीक्षा पुढे ढकलली आहे.
तांत्रिक दोष दूर झाल्यानंतर या परीक्षा ऑनलाईन घेतल्या जाव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्राद्वारा महापोर्टलच्या माध्यमातून परीक्षा घेणं टाळावं असे आवाहन केले होते.परीक्षा पुन्हा लांबणीवर गेल्याने उमेदवारांमध्ये कमालीची नाराजी निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version