काँग्रेस नेते पतंगराव कदम यांची कन्या भारतीताई लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास

17
Patangrao Kadam daughter Bharati Lad death
भारतीताई लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास

Patangrao Kadam daughter Bharati Lad death: काँग्रेसचे दिवंगत नेते व भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांची कन्या भारतीताई महेंद्र लाड यांचे पुण्यात वय (53) अल्पशा आजाराने सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी ‘एक्स’ या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या बहिणीच्या निधनावर शोक व्यक्त केला. “माझी मोठी बहीण आदरणीय भारतीताई महेंद्र लाड यांचं निधन झाल्याचे बातमी अतिशय दुःखद व वेदनादायी आहे. आजवरच्या वाटचालीत त्यांचं पाठबळ, प्रेम आणि स्नेह नेहमीच आमच्यासाठी ऊर्जादायी राहिले. त्यांच्या निधनाने कदम व लाड परिवाराची कधीच न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना,” अशी भावना विश्वजीत कदम यांनी व्यक्त केली.

भारती विद्यापीठाची स्थापना पतंगराव कदम यांनी आपल्या लाडक्या कन्या भारती यांच्या नावावरूनच केली होती. भारतीताई लाड या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रीय होत्या. त्यांच्या पश्चात पती महेंद्र लाड, भाऊ विश्वजीत कदम, बहीण अस्मिता जगताप असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कदम परिवारात शोककळा पसरला असून यावेळी विविध राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी, दिनेश वढणे