पाठीत खंजीर खुपसणे म्हणजे काय, हे पवारांना कळेल: शालिनीताई पाटील

सातारा: पाठीत खंजीर खुपसणे म्हणजे काय असते हे शरद पवार यांना चांगले कळेल, स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या पाठित खंजीर खुपसून त्यांचे चांगले सरकार पाडणाऱ्या शरद पवारांना पाठित अशी जहरी टीका माजी मंत्री डाॅ. शालिनीताई पाटील यांनी केली आहे. सातारा येथ त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

देशात विश्वासघातकी राजकारणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच जबाबदार आहेत. आजवर विश्वासघातकी राजकारण करणे शरद पवारांना नडले असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाळीला ते स्वत: जबाबदार आहेत, अशी गंभीर टीका त्यांनी केली आहे.
चौकशांमधून सुटण्यासाठीच काकाच्या पाठीत पुतण्याने खंजीर खुपसला. आज खऱ्या अर्थाने स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या आत्म्याला चिरशांती लाभली आहे, असं शालिनीताई पाटील म्हणाल्या.

शरद पवारांनी ५० वर्षांपूर्वी एक पाप केले होते. जे पाप केले ते इथेच फेडावे लागतात. कोणी दगा दिल्यास काय त्रास होतो हे शरद पवारांना अनुभवायला येईल, असेही त्या म्हणाल्या आहेत. दरम्यान, शालिनीताई कट्टर पवारविरोधक म्हणून ओळखल्या जातात.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा