गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा राशिन येथे कोरोनामुळे रूग्णाचा मृत्यु

राशिन येथे कोरोनामुळे रूग्णाचा मृत्यु

राशिन, २२.मे.२०२०: कर्जत तालुक्यातील महत्वाचे शहर म्हणून ओळखलं जाणारे राशिन या ठिकाणी कोरोनाचा रूग्ण सापडला असताना त्या रूग्णांचा मृत्यु कोरोना मुळे झाल्याचे दि. २१ ला रात्री उशिराने निषपन्न झाले आहे.

सविस्तर वृत्त असे की ७-८ दिवसापुर्वी राशिन येथे मुंबईहून ६० वर्षीय महिला आल्याचे वृत होते. ती महिला विलगीकरण कक्षात न राहता ३ दिवस घरीच राहील. नंतर त्यांना चौथ्या दिवशी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. दोन दिवसांनी त्यांना खोकला, ताप ही लक्षणं जास्त प्रमाणात दिसून आल्याने त्यांना अहमदनगर या ठिकाणी नेण्यात येत होते.पण वाटेतच त्यांचा मृत्यु झाला.

त्या नंतर महिलेला दवाखान्यात घेऊन गेले असता, त्यांची कोरोना चाचणी घेतली असता ती रात्री उशिराने कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निदर्शनास आले. त्या मुळे महिला ज्या ठिकाणी राहात होती तेथील सर्वाना प्रशासनाने ताब्यात घेतले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

error: Content is protected !!
Exit mobile version