गोल पोस्ट इतर पतीला मिळवण्यासाठी पत्नीचे धरणे आंदोलन

पतीला मिळवण्यासाठी पत्नीचे धरणे आंदोलन

औरंगाबाद: येथील एका विवाहित महिलेने सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळुन मंगळवार (दि.१४) पासून धरणे आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.
प्राजक्ता उदावंत असे या विवाहितेचे नाव आहे. औरंगाबाद येथील विजयकुमार डहाळे याची मुलगी प्राजक्ता हिचा विवाह हिंदू धर्मातील रिती रिवाजाप्रमाणे सचिन उदावंत यांच्या मुलगा सत्यजित उदावंत यांच्या सोबत दि ६ मे २०१८ रोजी झाला. ही महीला वैजापूर येथील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकांची मुलगी आहे.

प्राजक्ता हिचा पती सत्यजित हा नोकरी निमित्ताने अमेरिकेत वास्तव्य करतो. विवाहानंतर ४ महिने प्राजक्ता अमेरिकेत पतीसोबत राहीली. त्यानंतर नोव्हेंबर २०१८ मध्ये सत्यजित तिला वैजापूर येथे सोडून अमेरिकेला निघून गेला.
तेव्हापासून त्याने पत्नीशी संपर्क साधलेला नाही. या सर्व गोष्टीला सासरची मंडळीच जबाबदार आहेत. असा आरोप प्राजक्ता हिने केला आहे. तिचे सासरे सचिन हरिभाऊ उदावंत, सासु सुशीला सचिन उदावंत, दीर सागर सचिन उदावंत व जाऊ हे याला जबाबदार असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तसेच माझ्या पतीला परत आणून द्या. अशी मागणीसाठी प्राजक्ता ही धरणे धरून बसली आहे.

या आंदोलनाला आरपीआय आठवले गटाने, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय सुवर्णकार संघटना सह, मिनाताई, सोनार, सुधाकर टाक, विजयराव डहाळे, भगवानराव शहाणे, मुकुंद नागरे, धनंजय पळशेरकर, भगवान उदावंत, अनिताताई शहाणे आदी उपोषणात बसलेले आहेत. या वेळी सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल ढाकणे, यांनी चोख बंदोबस्त ठेवला. या धरणे आंदोलनामुळे उदावंत कुटुंबीयांचा वाद चव्हाट्यावर आला आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version