चेन्नई (वृत्तसंस्था) : पती-पत्नीमधील वाद सर्वच घरांमध्ये होत असतात. अनेकदा माहेरी निघुन गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी पती किंवा सासरची मंडळी जातात. परंतु चेन्नईमध्ये एक विचित्रच घटना घडली आहे. पत्नी भांडण झाल्यानंतर माहेरी निघून गेल्याने पतीने रागातून गुप्तांगच कापल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, चेन्नईच्या वॉशरमेनपट भागात हे दांपत्य राहते. बाबू (४०) आणि देवी (३५) असे पती पत्नीचे नाव आहे. या दांम्पत्याला अद्याप एकही अपत्य नाही. यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत होते. देवीला पती दारू पित असल्याचे आवडत नव्हते.त्यामुळे त्यांच्यात अनेकदा वादही झाले होते.पोलिसांनी अधिक तपास केला असता सांगितले की, देवी हिला पतीपासून घटस्फोट हवा होता. यामुळे ती सोमवारी घर सोडून निघून गेली.
मात्र, नवीन वर्ष साजरे करण्यासाठी ती मंगळवारी पुन्हा आली होती.
यावेळी बाबू पुन्हा दारू पिल्याने त्यांच्यात मोठा वाद झाला होता. यामुळे देवी पुन्हा माहेरी गेली.
यामुळे नाराज झालेल्या पतीने किचनमधील चाकू घेतला आणि गुप्तांग कापले. यानंतर त्याच्या किंचाळ्या ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर आहे.