MCA निवडणुकीत पवार-शेलार युतीनंतर पटोले नाराज

मुंबई, १७ ऑक्टोंबर २०२२ : मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या MCA निवडणुकीसाठी भाजपचे आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी युती केल्यानंतर आता महाविकास आघाडीतील नेते नाराज झाले आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या राजकारणाचा वास येतोय असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लावला आहे, नाना पटोले वृत्तवाहिनी माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.

अंधेरी पोटनिवडणुकीबाबत बोलताना नाना पटोलेंनी थेट आशिष शेलार आणि शरद पवारांकडे निशाणा केला आहे. ते म्हणाले की, सध्या एमसीएची निवडणूक सुरु आहे. MCA म्हणजे पैशाचा खजिना. याच पार्श्वभूमीवर जे देशातील आणि राज्यातील लोक चित्र पाहत आहेत. काल एकदम दोन नेत्यांनी बिनविरोध निवडणूक व्हावी अशी भूमिका घेतली. त्यामुळे एमसीएच्या राजकारणाचा कुठेतरी वास यामध्ये येत आहे, असं निश्चितपणे वाटत आहे.

पण मला थेट असा आरोप नाही लावायचा, एमसीएमध्ये जे काही सुरू आहे, त्यावर मी बोलत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत तीन निवडणूक झाल्यात एकही निवडणूक बिनविरोध झाली नाही. एमसीएच्या निवडणुकीनंतरच हा असा चमत्कार का घडतो? एक व्यक्ती भाजपचा मुंबई शहरातल्या एका नेत्याच्या घरी जातो आणि त्यानंतर असं काही होतं. यामध्ये नक्कीच एमसीए निवडणुकीचा वास आहे. असा संशयही नाना पटोलेंनी व्यक्त केला आहे. तसेच, पुढे बोलतात की एमसीए निवडणुकीत काय झालं. कोण-कोण एकत्र आलं? अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर त्याचा आम्हाला काही विरोध नाही. बाकी जनता समजदार आहे. असेही पटोले यांनी म्हंटले आहे.

महाविकास आघाडीचा प्रमुख विरोधक हा भाजप असूनही शरद पवारांनी भाजपसोबत युती केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी आत्तापर्यंत मौन धरले होते. पण नाना पटोले यांनी अखेर मौन सोडलं असून शरद पवारांच्या या खेळीवर उघड नाराजी व्यक्त केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा