पत्रकाराच्या हत्येप्रकरणी पाच जणांना मृत्युदंडाची शिक्षा

21

नवी दिल्ली : सौदी अरेबियाच्या न्यायालयाने पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्या प्रकरणातील ५ आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे.
इस्तांबुलमधील सौदी अरेबियाच्या दूतावासात मागील वर्षी जमाल खाशोगी यांची सौदीच्या एजंटन्सनी हत्या केली होती.
वॉशिंग्टन पोस्ट वर्तमानपत्रात जमाल खाशोगी स्तंभलेखक होते. याच प्रकरणात आणखी ३ आरोपींना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स महंमद बिन सलमान यांच्यावर खाशोगी यांच्या हत्येवरुन चौफेर टीका झाली. कारण या हत्येमध्ये गुंतलेले एजंटन्स थेट महंमद बिन सलमान यांच्यासाठी काम करायचे.
खाशोगी यांची हत्या क्राऊन प्रिन्सच्याच निर्देशावरुन झाल्याचा आरोप करण्यात येत होता.
या हत्येशी महंमद बिन सलमान यांचा काहीही संबंध नाही. याबद्दल त्यांना काहीही माहित नसल्याचे अनेकवेळा सौदी अरेबियाकडून स्पष्ट करण्यात आले होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा