गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा पत्रकार रामचंद्र चौधरी काळाच्या पडद्याआड

पत्रकार रामचंद्र चौधरी काळाच्या पडद्याआड

सोरतापवाडी : पूर्व हवेलीतील एक नामांकित पत्रकार काळाच्या पडद्याआड गेल्याने पत्रकारीच्या क्षेत्रात चटका लावणारी घटना घडल्याचे चित्र निर्माण झाले आहे,उरुळीकांचन येथील पत्रकार
रामचंद्र चौधरी वय ( ४५ वर्ष ) यांचे काल बुधवारी सायंकाळी आकस्मिक निधन झाले. ही बातमी हवेलीतील पत्रकार क्षेत्रात वाऱ्यासारखी पसरली आणी सर्वच स्तब्ध झाले.

रामचंद्र चौधरी गेल्या दहा ते तेरा वर्षांपासून एक नामांकित वृत्तमानपत्रात काम करत होते ( प्रभात )तसेच ते मतिमंद विद्यालयात शिक्षक म्हणून काम करत होते .अत्यंत मनमिळवू व प्रत्येक सामाजिक कार्यात सहभाग घेत असत .यात ग्रामस्वछता अभियान किंवा कोणाला वैयक्तिक सहकार्य करत असे ,व त्यांच्या मागे पत्नी ,एक मुलगा व एक मुलगी आहे ,आई वडील व भाऊ असा परिवार आहे.

त्यांच्या पत्नी सोरतापवाडी गावच्या माजी उपसरपंच होत्या व मुलगा व मुलगी उच्चशिक्षित आहेत आज सकाळी नऊ वाजता त्याच्या मूळ गावी सोरतापवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.ये वेळी परिसरातील राजकीय सामाजिक ,पत्रकारी क्षेत्रात पदाधिकारी व नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष सिताराम लांडगे म्हणाले की आपला एक सच्चा दिलदार साथी हरवला आहे .ही पोकळी कधिच भरून निगणार नाही .एक तरुण सहकाऱ्यचे अचानक जाणे मनाला चटका लाऊन जाणारे ठरले.

error: Content is protected !!
Exit mobile version