पाटवड्या

साहित्य:
• २ वाटी बेसन पीठ
• अर्धी वाटी किसलेले सुखे खोबरे
• अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
• १ चमचा खसखस
• १ छोटा चमचा कांदा-लसून मसाला
• मीठ
• २ चमचे तेल
• बारीक चिरलेला कांदा

कृती:
• दोन चमचे तेलाची फोडणी द्या, अर्धी फोडणी वाटीत काढून घ्या आणि उरलेल्या फोडणीत दोन वाट्या पाणी घाला.
• पाण्याला उकळी आणा नंतर बेसन पीठ, मीठ एकत्र करून घ्या व उकळलेल्या पाण्यात बेसनपीठ घालून पळीने घोटा.
• पिठाच्या गुठल्या मोडून घेऊन नंतर झाकण ठेऊन दणदणीत वाफ आणा.
• ताटाला तेल लावून ताटात पीठ थापा.
• एक चमचा तेल कडक करून त्यात खोबर, कोथिंबीर, खसखस, काळा मसाला, मीठ घालून लालसर परता.
• ताटात थापलेल्या पीठावर हा मसाला पसरावा व शंकरपाळीच्या आकाराच्या मोठया वड्या कापा.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा