पावसामुळे आंब्याची आवक लांबणीवर

कोकण: मार्च मध्ये येणाऱ्या हापूस आंब्याची आवक लावणीवर गेली आहे. हापूस साठी एप्रिल महिना उजाडन्याची शक्यता आहे. उन्हाळा आला की सर्वांना हापूस आंब्याची चाहूल लागते. याच हापूस ची चव चाखण्यासाठी आता थोडी कळ काढावी लागणार आहे.
हापूसच्या दिरंगाई कारण आहे अवकाळी पाऊस आणि क्यार चक्रीवादळ. चक्रीवादळामुळे परतीचा पाऊस या वेळेस चांगलाच लांबणीवर गेला आहे. यामुळे कोकणातील भात शेतीबरोबरच हापूसच्या मोहरावर ही परिणाम झाले आहे. आता आलेल्या पालवी ला ही करपा रोग आणि तुडतुद्यंचा प्रभाव पडला आहे. त्यामुळे अंबा बाजारात यायला किमान दीड महिन्यांचा उशीर होणार आहे.
जास्त पावसामुळे पळविवर बुरशी आली आहे ही बुरशी पुढे फळावरही येऊ शकते. एकीकडे आपला अंबा बाजारात यायला उशीर होणार असला तरी दुसरीकडे बाजारात मालवी अंबा बाजारात आला आहे. हा अंबा आफ्रिकेतील मालवी देशातील आहे. तो जरी तिथला असला तरी त्याचे मूळ आपल्या महाराष्ट्रातीलच आहे. या आंब्यांची किंमत १६०० रुपये पासून ते १८०० रुपया पर्यंत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा