पवन कदम यांचा हॉस्टेलच्या रूमपासून ते दुबईच्या ऑफिसपर्यंतचा प्रवास..

126
Pawan Kadam's journey from his hostel room to his office in Dubai. Baked Moon Studios Journey in Pavan Kadam
पवन कदम "हॉस्टेलच्या रूमपासून ते दुबईच्या ऑफिसपर्यंतचा प्रवास"

Written by प्रथमेश पाटणकर
Research by आदित्य जायभाये

Baked Moon Studios founder Pavan Kadam: तुमचे स्वप्न मोठी असतील तर त्यात अपयश येतच राहतात. मात्र, त्यातून तुम्ही पळ न काढता कष्ट, सातत्य आणि संघर्ष करत असाल तर तुम्हाला यश नक्कीच मिळत. एक वसतिगृहाची खोली तुमच्या स्वप्नांना शेवटच्या यशापर्यंत घेऊन जाऊ शकते आणि हेच पुण्यातील पवन कदम यांनी करून दाखवल आहे. एक २७ वर्षीय तरुण मुलगा, ज्याने MBA सोडून अ‍ॅनिमेशनच्या दुनियेत आपल्याला घडवण्याचा निर्णय घेतला. पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी एमबीएला प्रवेश घेतला. मात्र MBA ला त्यांच मनं लागेनासे झाले. पवनला गोष्टिंना जीवंत करायच होत, चित्र रंगवायची होती. त्यामुळे धाडसी पाऊल उचलत त्यांनी एमबीए सोडून पुण्यातील मॅक येथे 3D अ‍ॅनिमेशनचा कोर्स करण्याचा निर्णय घेतला. हा कोर्स करता करता त्यांनी फ्रीलनसिंग काम सुरू केल. कधी Story Boarding तर कधी 3D सीन असे प्रत्येक प्रोजेक्ट ते घेत होते.

Pavan Kadam Founder of Baked Moon Studios Pvt. Ltd in Pune

फ्रीलान्सिंगच्या समस्येवर अशी केली मात :

पवन कदम सांगतात, फ्रीलनसिंगच काम सोप नव्हत. पैसे वेळेवर भेटत नसायचे. ३० दिवसांचे वचन ९० दिवसांवर जायचे. परंतु, खचून न जाता पवन एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी स्वत:ला वेळ देत,अ‍ॅनिमेशनच्या दुनियेचा खोलवर अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. अ‍ॅनिमेशनची दुनिया कशी आहे हे त्यांनी समजून घेतल. त्यांना एक संधी मिळाली आणि त्याच त्यांनी सोन केल. “3D कॉन्फिगरेटर कंपन्यांना ” त्यांच्या सॉफ्टवेअरसाठी कुशल काम करणाऱ्या मुलांची गरज होती. पवनने त्यांच्याशी संपर्क साधला, आपलं काम दाखवलं आणि त्यांना ते आवडलं व त्या कंपनीसोबत काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

Baked Moon Studios Pvt. Ltd :

त्यांना या कंपनीत आपला पहिला फ्रीलनसिंग प्रोजेक्ट मिळाला. जो की १२००० हजार रुपयांचा होता. त्याच १२ हजार रुपयांची गुंतवणूक करून पवन कदम यांनी २०१८ मध्ये एका वसतिगृहाच्या खोलीत “बेक्ड मून स्टुडिओज प्रायाव्हेट लिमिटेड या 3D मॉडेलिंग” कंपनीची स्थापन केली. त्यांच्या स्टार्टअपने ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी (AR) आणि व्हर्च्युअल ट्रायऑन (VR) ई-कॉमर्ससाठी थक्क करणारे 3D व्हिज्युअल्स बनवायला सुरुवात केली. भारतीय क्लायंट्सकडून पैसे मिळवण्यासाठी झगडावं लागत असल्याने. त्यांनी युरोप, अमेरिकेकडे लक्ष केंद्रित केलं. आता तिथून त्यांना ७०% व्यवसाय येतोय. अस पवन कदम सांगतात.

आज Baked Moon Studios Pvt. Ltd मध्ये 30 हून अधिक कर्मचारी आहेत. वर्क फ्रॉम होम कामाची सुविधा, आणि सुरुवातीपासून एकत्र असलेली घट्ट टीम. विशेषबाब म्हणजे त्यांच्या कंपनीने आतापर्यंत २० कोटींचा नफा कमावला आहे. आता त्यांचा ते विस्तार दुबईत करणार आहेत. पवन नवीन स्वप्न पाहणाऱ्याना मुलांना सांगतात की, “छोट्याशा सुरुवातीने काम सुरू करा. १०-१५ हजार पगार, एक लॅपटॉप आणि छान आयडिया पुरेशी आहे. योग्य लोकांना सोबत घ्या, नेटवर्किंग करा आणि मनापासून काम करा. विश्वास निर्माण करा, म्हणजे क्लायंट पुन्हा पुन्हा तुमच्याकडेच येतील.”