पवार काय करतील सांगता येत नाही 

मुंबई: निवडणुकीच्या निकालानंतर बच्चू कडू यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे.
नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत शरद पवारांचं काहीही सांगता येत नाही. ते काहीही करू शकतात. काय ते आम्हालाही सांगता येणार नाही. कारण, जे अजित पवारांना कळत नाही ते आम्हाला कसं कळणार,’ असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. सध्याच्या घडामोडींबद्दल एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी दिलखुलास मतं मांडली. नव्या आघाडीचे मुख्यमंत्री कोण व्हावेत असं विचारलं असता तो शिवसेनेचा निर्णय असेल असं ते म्हणाले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यास चांगलं असेल, असं ते म्हणाले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस, विशेषत: शरद पवारांच्या राजकारणाबद्दल त्यांनी साशंकता व्यक्त केली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा