मुंबई, १५ जुलै २०२१: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राष्ट्रपती पदासाठी उमेदवार बनवल्याच्या चर्चेला त्यांनी स्वत: च विराम आहे. शरद पवार म्हणाले की, प्रशांत किशोर यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबद्दल माझ्याशी बोलणी केली हे पूर्णपणे निराधार आहे. याचा प्रश्नच उद्भवत नाही. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी कोणती गणितं जुळवली हे मला माहित नाही. जेव्हा ते मला भेटले, तेव्हा ती बैठक बिगर राजकीय होती. २०२४ च्या निवडणुकांबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.
वास्तविक असे मानले जाते की, प्रशांत किशोर संपूर्ण विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात गुंतले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुढील राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले जाऊ शकते अश्या चर्चा सध्या सुरू आहेत. प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांनंतर शरद पवारांची सुमारे तीन वेळा भेट घेतली आहे. सन २०२२ मध्येच राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ पूर्ण होईल, अशा परिस्थितीत, देश नवीन राष्ट्रपतींच्या शोधात आहे. तर दुसरीकडं विरोधी पक्ष आपला उमेदवार शोधण्यात व्यस्त आहे.
निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी मंगळवारी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. या वेळी केके वेणुगोपाल आणि प्रियंका गांधीही तेथे उपस्थित होते. प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरही काम केले आणि भाजपला सत्ता मिळविण्यात मदत केली. यानंतर त्यांनी पंजाब, बिहार, आंध्र प्रदेश, तामिळनाडू यासारख्या राज्यांमध्ये रणनीतिकार म्हणून काम केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे