बीडमध्ये पवारांचा कार्यकर्त्यांना लढण्याचा मंत्र

77

पुणे ३० जानेवारी २०२५ : बीड शहरात राष्ट्रवादी कॉग्रेसला धक्का बसला असला तरी महायुतीने पाच मतदारसंघामध्ये विजय मिळाला आहे . सुरुवातीला आघाडी घेतलेल्या राष्ट्रवादीला नंतर पराभव स्वीकारावा लागला मात्र , या अपयशाने खचून न जात नव्याने जोमाने कामाला लागा , असा संदेश राष्ट्रवादीने कॉग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्याना दिले

बीड दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. “शहरात अपयश आले, पण हे शेवट नाही! नव्या उमेदीने काम करा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली ताकद वाढवा, लोकांचा विश्वास जिंका,” असा ठाम संदेश त्यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा ठाम आणि सेक्युलर असल्याचे अधोरेखित करताना ते म्हणाले, “यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला मजबूत विचारधारा दिली. त्यांच्या आदर्शावर चालणे हीच खरी राजकारणाची शिस्त आहे.”कामाच्या गुणवत्तेवर भर देत भ्रष्टाचाराला ठाम विरोध दर्शवत अजित पवार म्हणाले, “कोणतेही काम मंजूर झाल्यास ते उच्च दर्जाचे असले पाहिजे. वेडेवाकडे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. जनतेचा पैसा हे मोठे दायित्व आहे, तो सत्कारणी लागलाच पाहिजे.”

राज्यात विकासाचे धोरण मजबूत करण्यासाठी केंद्राकडून अधिकाधिक निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.अजित पवारांच्या या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नव्या उमेदीचा संचार झाला असून, आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस नव्या रणनीतीने मैदानात उतरणार आहे!

न्युज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे