वेळेवर ई एम आय भरताय ? मग मिळणार मोठा दिलासा

नवी दिल्ली, १९ ऑक्टोबर २०२०: कर्ज धारकांना केंद्र सरकार काढून मोठा दिलासा मिळणार आहे. दोन कोटी पर्यंतच्या कर्जावरील चक्रवाढ व्याज म्हणजेच ई. एम.आय. माफ करण्याची तयारी केंद्र सरकारतर्फे दर्शवण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकार या गोष्टीवर विचार करत आहे. या मुळेच कर्जदारांना कोरोनाच्या कठीण काळातही मोठा दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या आधीच यावर अधिकृत घोषणा होऊ शकते.

गृह कर्ज तसेच मोरॅटोरियमच्या काळात वेळेवर ई एम आय भरलेल्या सगळ्याच कर्ज धारकांना व्याजात सवलत मिळू शकते. मोरॅटोरियम म्हणजे कर्जाचे हफ्ते पुढे ढकलण्याचा अधिकार १ मार्च ते ३१ ऑगस्ट या मोरॅटोरियम काळातील व्याजावरील व्याज माफ करण्याचा योजनेवर काम सुरू असून, कदाचित हीच सवलत सर्व प्रकारच्या कर्जांवर देण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे.

दरम्यान, चक्रवाढ व्याज देताना सेक्टारणीहाय दूजाभाव केला जाणार नाही. व्यक्तिगत कर्जावर चक्रवाढ व्याज माफी द्यायची आणि गृहकर्जदाराला द्यायची नाही, हे शहानपणाचे ठरणार नाही. दोन कोटींपर्यंतच्या सर्व कर्ज धारकांना ही व्याजमाफी दिली जाईल. असं अर्थमंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा