पुणे, दि. २९ मे २०२०: सध्या सर्वत्र कोरोनाव्हायरस चे संकट चालू आहे. जेलमधील कैद्यांना संसर्ग होऊ नये म्हणून राज्य सरकारने कैदी पॅरोलवर बाहेर सोडण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये येरवडा कारागृहात देखील समावेश आहे. परंतु या दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येरवडा कारागृहातून सोडण्यात आलेल्या एका कैद्याची निर्घुण हत्या करण्यात आली आहे.
नितीन शिवाजी कसबे (वय-२२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सदर हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हा कैदी तुरुंगातून बाहेर पडताच अवघ्या काही तासांमध्ये त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. या हल्ल्यामध्ये नितीन कसबे याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून संबंधित गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी १६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी चार जणांना पोलिसांनी अटक करून पुढील कारवाई सुरू ठेवली आहे. सदर कारवाईत गुन्हेगारांची नावे पुढील प्रमाणे: आकाश कनचीले, आकाश सपकाळ, गणेश आडसूळ, निखिल कांबळे, चेतन भालेराव, ओमकार, सोनवणी व इतर आणखीन आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर घटना अशी की, संबंधित मायत नितीन कसबे हा गेल्या सहा महिन्यांपासून मारहाण व इतर गुन्ह्यांसाठी येरवडा कारागृहात होता. नितीन कसबे याला काल (२८ मे) पॅरोलवर बाहेर सोडण्यात आले होते. संध्याकाळी तुरुंगातून बाहेर पडताच तो आपल्या मित्राच्या घरी गेला होता. मित्राच्या घरून रात्री अकराच्या सुमारास आपल्या घरी पायी जात असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यावेळेस त्याच्यावर धारदार हत्याराने वार करण्यात आले व त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. शादल बाबा चौकाजवळ रेड्डी हॉटेल समोर त्याच्यावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या डोक्यावर, हातावर, पायावर वार करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी