गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पिंपरी-चिंचवड शहरात ‘पीएम सूर्यघर’ योजनेची क्रांती ४,३०० हून अधिक घरांवर सौरऊर्जा प्रकल्प!

पिंपरी-चिंचवड शहरात ‘पीएम सूर्यघर’ योजनेची क्रांती ४,३०० हून अधिक घरांवर सौरऊर्जा प्रकल्प!

पिंपरी-चिंचवड ९ सप्टेंबर २०२५ : भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम सूर्यघर योजने अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात तब्बल ४,३८६ घरांवर सौरऊर्जा पॅनेल्स बसवण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना वीजबिलात मोठ्या प्रमाणावर बचत होत असून, पर्यावरणपूरक वीज निर्मितीलाही चालना मिळत आहे.

या सौर पॅनेल्समधून दररोज २३.७९ मेगावॉट वीज निर्मिती होत आहे. महावितरणच्या पिंपरी विभागात २,१३४ घरांवर सोलर पॅनेल्स बसवून १३.५८ मेगावॉट वीज तयार होते, तर भोसरी विभागातील २,२५२ घरांवर बसवलेल्या पॅनेल्समधून १० मेगावॉट वीज निर्मिती केली जाते.

योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक सबसिडी योजना.

  • १ किलोवॅट क्षमतेसाठी ₹३०,००० सबसिडी
  • २ किलोवॅट क्षमतेसाठी ₹६०,००० सबसिडी
  • ३ किलोवॅट क्षमतेसाठी तब्बल ₹७८,००० पर्यंत सबसिडी

या योजनेमुळे सौर पॅनेल्स बसवणे आता सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात आले आहे. एवढेच नव्हे तर, घरातील अतिरिक्त वीज महावितरणला विकून अतिरिक्त उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध आहे.

कार्यकारी अभियंता विश्वास भोसले यांनी सांगितले की, या योजनेमुळे नागरिकांना वीजबिलात मोठी बचत होत असून, थेट आर्थिक लाभ मिळत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version