बिगर मास्कचे व पिचकारी मारताना सापडल्यास ५०० रुपये दंड

बारामती, दि. ६ जुलै २०२० : शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क न लावता वावरणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी पान,गुटखा, तंबाखु खाऊन पिचकारी मारणाऱ्या नागरिकांवर आता ५०० रुपये दंडाची कारवाई होणार आहे. काल शहरातील २५ पानटपरी चालकांवर १८८ अन्वये कारवाई करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश दिले आहेत.

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सार्वजनिक ठिकाणी बिगर मास्क भटकणाऱ्या व पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांवर नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत तसेच छावणी परिषद हद्दीमध्ये या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यानुसार जे नागरिक सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करता उभे असलेले, गाडी चालवताना आढळल्यास यापूर्वी पोलीस प्रशासन व बारामती नगर पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे.

त्या बरोबरच आता सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकल्यास पाचशे रुपये दंड द्यावा लागेल याचे सर्व अधिकार ग्रामस्तरावर ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत कर्मचारी यांना तसेच नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकार्‍यांना दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर साथीरोग नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.


न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा