फेरफार नोंदी वेळेत न झाल्यास तलाठ्याला प्रतिदिन ५०० रुपये दंड

7

बीड,दि.२ जून २०२० : फेरफार घेण्यास उशीर लावणे आता तलाठ्यांच्या अंगलट येणार आहे. फेरफार प्रमाणिकरणासाठी उपलब्ध होऊनही तो १५ दिवसाच्या आत मंजूर न झाल्यास त्यानंतर पुढील प्रत्येक दिवसासाठी तलाठ्याला पाचशे रुपये दंड आकारण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

डिजिटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमा अंतर्गत सातबारा संगणकीकरण व ई-फेरफार कार्यक्रम प्रगतीपथावर आहे. त्याद्वारे नागरिकांना अचूक संगणकीकृत अधिकार अभिलेख जलदगतीने व विहित कालावधीत पुरविण्यासाठी महसूल प्रशासन प्रयत्नशील आहे. परंतू तलाठ्यांकडून फेरफाराच्या कामास उशीर होत असल्याने नागरिकांना अभिलेखे मिळण्यास प्रचंड विलंब होतो.

त्यामुळे ज्या तलाठ्यांकडे दस्त प्राप्त झाल्यानंतरही फेरफार तयार न करणे, सदर फेरफार नोटीस न बजाविणे, नोटीस दिल्याची दिनांक न भरणे, ई तसेच मंडळ अधिकारी यांचेकडे फेरफार प्रमाणिकरणसाठी उपलब्ध होऊनही तो विहित १५ दिवसाच्या कालावधीत मंजूर न करणे इत्यादी बाबी निदर्शनास येतील, अशा तलाठ्यांना सदर फेर बाबतचा कार्यवाहीचा कालावधी संपल्याच्या तारखेपासून व मंडळ अधिकारी यांच्याकडील प्राप्त प्रमाणिकरण करण्याचा १५ दिवसाचा कालावधी संपल्यापासून पुढील प्रत्येक दिवसाला पाचशे रुपये दंड आकारण्यात यावा असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा