प्रलंबित शेतकऱ्यांना मिळणार फळ पिक विम्याचा लाभ – खा. रक्षाताई खडसे

जळगाव, २७ फेब्रुवारी २०२४ : गेल्या अनेक महिन्यापासून जळगावातील शेतकऱ्यांच्या केळी पीक विम्याचा विषय प्रलंबित होता. तो लवकरच मार्गी लागणार असल्याचे खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले आहे.

पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार” सन २०२२ मध्ये एकूण ७८ हजार शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविलेला होता. त्यातील प्रलंबित असलेल्या ५४ हजार शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात पिक विम्याच्या नुकसान भरपाईचा लाभ मिळणार होता. त्यातील ४५ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून अनेक शेतकऱ्यांना टप्याटप्याने लाभ मिळणार आहे. तर राहिलेल्या ९ हजार शेतकऱ्यांना एकूण ३० कोटी ७२ लाख ७२ हजार ५७७ रक्कम वितरीत करण्यात आले आहे. यात नाकारण्यात आलेल्या ११ हजार २२ शेतकऱ्यापैकी ६ हजार ६८६ शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळणार असल्याबाबत माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आत्माराम गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा