सततच्या लॉकडाऊनमुळे लोकं आत्महत्या करून मरतील – नितीन गडकरी 

नवी दिल्ली, दि १ ऑगस्ट २०२०: केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे आपलं परखड मत मांडण्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळे त्यांच्या व्यक्तव्याकडे अनेकांचे लक्ष लागलेले असते. आज त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली त्यात त्यांनी आपल्या अनेक भूमिका स्प्ष्ट केल्या आहेत.

सध्या कोरोनामुळे देशासह राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. गेल्या चार महिन्यांपासून सतत करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सामान्य जनतेच्या आणि मुख्यतः गरीब मजुरांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने सद्यस्थितीत जगण्याचे आव्हान जनतेसमोर निर्माण झालं आहे. असे असतांना देखील सरकारकडून कोरोनाच्या नावावर सतत लॉकडाऊन करण्यात येत आहे.

याबाबत गडकरी म्हणाले कि, कोरोनाचं संकट हे जागतिक संकट आहे. त्यामुळे कोणताही एक्सपर्ट खात्रीशीर मार्ग सांगू शकत नाही. मात्र आता आपल्याला कोरोनासोबत जगायला शिकावं लागेल. लॉकडाऊन किती दिवस करणार? कोरोनापेक्षा भयंकर संकट हे अर्थव्यवस्थेचं आहे. सततच्या लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठं नुकसान होईल. गरीबांना रोजगार नसल्यानं त्यांच्यावर उपाशी मारण्याची वेळ येईल. लोकं कोरोनाने नाही पण आत्महत्या करून मरतील त्यामुळे सततचा लॉकडाऊन हा काही खात्रीशीर मार्ग नसल्याचं त्यांनी सांगितलं.

त्याचप्रमाणे लोकांनी काळजी घेत सरकारचे सर्व नियम पाळत आपलं काम करणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा