या रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका….

जर्मनी, दि.१८ जुलै २०२० : जगभरात कोरोना व्हायरसवर अनेक संशोधनं केली जात असतानाच आता जर्मनी आणि नॉर्वेच्या संशोधकांनी कोरोनासोबत वेगवेगळ्या रक्तगटांच्या संबंधांचा अभ्यास केला.या संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षांचा अहवाल ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. संशोधकांनी या संशोधनासाठी इटली आणि स्पेनमधील १६१० रुग्णांची निरिक्षणं नोंदवली. ज्यामध्ये अनेकांना कोविड-१९ मुळे श्वास घेण्यास त्रास होत होता. या सर्व रुग्णांची परिस्थिती कोरोनामुळे गंभीर झाली असून त्यापैकी अनेकांचा मृत्यूही झाला आहे.

कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका ‘A’ रक्तगट असणाऱ्या लोकांना आहे. तर ‘O’ रक्तगट असणाऱ्या लोकांना कोरोना व्हायरसची लागण होण्याचा धोका सर्वात कमी असल्याचं निष्पन्न झालं. संशोधातून निष्पन्न झाल्यानुसार जर एखाद्या ‘A’ रक्तगट असणाऱ्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली तर त्याला ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची किंवा व्हेंटिलेटरवर ठेवण्याची आवश्यकता हि ‘O’ रक्तगट असणाऱ्या रुग्णांपेक्षा दुप्पट असू शकते.

संशोधकांनी अहवालातून स्पष्ट केलं आहे की असं अजिबात नाही की ‘O’ रक्तगट असणाऱ्या लोकांना कोरोना व्हायरसची लागण होवूच शकत नाही. तसेच ‘O’ रक्तगट असणाऱ्या व्यक्ती युनिवर्सल डोनर म्हणून ओळखल्या जातात. म्हणजेच जर दुसऱ्या कोणत्याही रुग्णाला रक्ताची गरज असेल तर त्याला ‘O’ रक्तगट असणाऱ्या व्यक्तीचं रक्त दिलं जाऊ शकतं.


न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा