मुंबई, दि. २१ जून २०२० : देशात कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्ली सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. त्याचबरोबर देशातील कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या चार लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत भारतात सरकारकडून प्रमाणित केले गेलेले असे कोणतेही औषध या विषयांसाठी उत्पादित केले जात नव्हते. आता भारतीय औषध महानियंत्रक (डीजीसीआय) ने अँटिव्हायरल औषध फेविपिरावीरला फैबि फ्लू या औषधाच्या निर्मितीसाठी आणि मार्केटिंगसाठी परवानगी दिली आहे. फैबि फ्लू हे औषध कोविड १९ रुग्णांवरील उपचारासाठी वापरण्यात येणार आहे.
तथापि हे औषध किती प्रभावी ठरेल, हे येत्या काही महिन्यांतच कळेल, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने म्हटले आहे की कोविड -१९ च्या सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांनी ‘फेबिफ्लू’ या ब्रँड नावाने अँटी-व्हायरस औषध ‘फेवीपीरावीर’ आणले आहे. कंपनीने म्हटले आहे की या औषधाची किंमत प्रति टॅबलेट सुमारे १०३ रुपये असेल. त्यात म्हटले आहे की, ‘फेबिफ्लू’ हे भारतातील केविड -१९ च्या उपचारांसाठी टॅबलेट स्वरूपात घेतले जाणारे पहिले ‘फेविपिराविर’ मंजूर औषध आहे.
फोर्टिस हॉस्पिटल, शालीमार बाग येथील श्वसन रोग आणि निद्रानाश विकार विभागाचे संचालक डॉ. विकास मौर्य म्हणाले, ” हे औषध जपानमधील इन्फ्लूएंझासाठी आधीच वापरली जात आहे. ते कोविड -१९ रूग्णांवरही वापरत आहेत. ‘रेमाडेसीव्हिर’ आणि ‘फविपिरावीर’ सारख्या अँटीवायरल औषधे कोविड -१९ साठी विशेषतः वापरली जात नाहीत, परंतु इन्फ्लूएंझासाठी वापरली जातात. ‘फवीपिरावीर’ चे काही फायदे आहेत आणि म्हणूनच भारतातही ते वापरण्यास परवानगी मिळाली आहे.”
न्यूज अनकट प्रतिनिधी