नवी दिल्ली : आजचे आधुनिक तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. दररोन नवनवीन गोष्टी बाजारात येत आहेत. मोबाईल, कम्प्युटर, डिजिटलायझेशन, इंटरनेट मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे आपला पर्सनल डेटा सुरक्षित ठेवण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. यासाठी आता जगभरात ‘USB कंडोम’ नावाने ओळखले जाणार एक डिव्हाइस लोक खरेदी करत आहे. याची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
एक सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे की, मोबाइलसाठी वापरले जाणाऱ्या या डिव्हाइसचा लोकांच्या खासगी आयुष्याशी काहीही संबंध नाही. आजकाल सार्वजनिक ठिकाणी कॉमन युएसबी पोर्ट किंवा चार्जिंग वापरले जाते. अशावेळी युएसबी कंडोमचा वापर उपयुक्त ठरतो.
हे एक असं डीव्हाईस आहे, की ज्यामुळे कोणताही स्मार्टफोन, टॅबलेट किंवा इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमधून डेटा ट्रान्सफर होण्यापासून रोखतो. यामुळे फक्त चार्जिगसाठी इलेक्ट्रीसिटी पास होते आणि डेटा ट्रान्सफर होत नाही.
युएसबी चार्जिंग स्कॅमचे प्रमाण वाढले आहे. यामुळे युएसबी कंडोम गरजेचे बनलं आहे. याचा वापर करून डेटा सुरक्षित ठेवता येतो. हॅकर्स पब्लिक चार्जिंगच्या मदतीने युजर्सना टार्गेट करतात. यातून डिव्हाइसमध्ये मालवेअर इन्स्टॉल केले जातात. युजर्स जेव्हा पब्लिक चार्जिंग स्टेशनचा वापर करतात. तेव्हा फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल होतात आणि पर्सनल डेटा आणि पासवर्ड चोरी केले जातात.
काहीवेळा हॅकर्स त्यांचा चार्जर पब्लिक स्टेशनला तसाच ठेवून देतात. याचा वापर कऱणाऱे हॅकर्सच्या जाळ्यात अडकतात. अनेकदा यामुळे युजर्सचा फोनही लॉक होतो. अशा वेळी डेटा ब्लॉकर म्हणजेच युएसबी कंडोम तुमच्याकडे असेल तर केबल किंवा चार्जिंग स्पेस वापरताना डेटा सुरक्षित ठेवण्यास मदत होते.