पीटर वेन गेटची भ्रमंती..

पुणे: भारतातील निसर्गसौंदर्याची बेल्जियमच्या “पेटर वेग गेट ” या अवलीयला भुरळ पडली. त्यावर त्याने महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यांचे अवघ्या दोन महिन्यात २००किल्ले सर केले आहे. याशिवाय पेटरने हिमालयातील खडतर भागात जाऊन काही गोष्टींचा अभ्यासही केला आहे.

पीटरने ही भ्रमंती करताना उंच गडकिल्ले सर करताना आपल्यासोबत कमी वजन असावे यासाठी काळजी घेतली. पाठीवर बॅग, आपल्या दैनंदिन वापराच्या वस्तू, तंबू घेऊन त्याने भटकंती सुरू केली. याशिवाय तो हॉटेल मध्ये न राहता कोणाच्याही घरी राहतो. तो पॅकबंद बाटलीतले पाणी पिणेही टाळतो. यामुळे गडावर प्रदूषण नको अशी भावना त्याने बोलून दाखवली.

गडकिल्ल्यांचा प्रवास करीत असताना नागरिकांनी मला पिठलं आणि भाकरी खायला दिली. हे सर्वात लवकर बनवता येणारे जेवण असल्याने त्याचा मोह न आवरल्याने पीटर ते जेवण बनवायला शिकला. हे भारतातले सर्वात आठवणीतले राहणारे जेवण असल्याने पीटरने यावेळी सांगितले.

महाराष्ट्रातील गड किल्ले पाहून खूप प्रेरणा मिळते. पण हे किल्ले सर करत असताना रस्त्यात चिप्सचे रिकामे पुडे, पाण्याच्या बाटल्या तसेच किल्ल्यांच्या भिंतींवर लिहिलेले चित्र विचित्र आकृत्यांमुळे वाईट वाटल,अशी खंतही त्याने बोलून दाखवली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा