नवी दिल्ली, १७ जानेवारी २०२३ : देशातील इंधनाचे दर तेल कंपन्यांनी जारी केले आहेत. आजच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले, तर ब्रेंट क्रूड ऑईल, डब्ल्यूटीआयच्या किंमतीमध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही. यापूर्वी २२ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत बदल करण्यात आला होता.
दिल्लीत पेट्रोलचा दर ९६ .७२ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर ८९.६२ रुपये प्रति लिटर इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लिटर, डिझेलचा ९२.७६ रुपये प्रति लिटर आणि चेन्नईत पेट्रोलसाठी १०२.६५ रुपये आणि डिझेलसाठी ९४.२५ रुपये मोजावे लागत आहेत.
- पुण्यात पेट्रोल १०५ रुपये ९६ पैसे
तर नाशिक, मुंबई, नागपूर आणि यवतमाळसारख्या शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले आहेत. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर १०६ रुपये ५१ पैसे, तर डिझेलचा दर ९३ रुपये ०२ पैसे आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर १०६ रुपये ३१ पैसे आहे, तर डिझेल ९४ रुपये २७ पैसे, अहमदनगर जिल्ह्यात पेट्रोलचा दर १०६ रुपये ४२ पैसे तर डिझेलचा दर ९२ रुपये ९४ पैसे इतका आहे. तर पुणे शहरात पेट्रोलचा दर १०५ रुपये ९६ पैसे तर डिझेलचा दर ९४ रुपये ४८ पैसे आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.