वर्षाच्या शेवटच्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ? जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली, ३१ डिसेंबर २०२२ : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी घसरण सुरू असलेल्या कच्च्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरवाढीचा परिणाम भारतातील पेट्रोल, डिझेलच्या दरावर झाला नसल्याचे चित्र आहे. आज सकाळी इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.

आज मुंबईत एक लिटर पेट्रोलचा भाव १०६. ३१ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०२.६३ रुपये इतका आहे. तर कोलकात्यात एक लिटर पेट्रोल १०६.०३ रुपये झाले आहे. तर जयपूरमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी १०८.६७ रुपये मोजावे लागत आहेत.

मुंबईत डिझेलचा भाव ९४.२७ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८९.६२ रुपये झाले आहे. चेन्नईत ९५.२४ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.७६ रुपये प्रति लीटर झाला आहे. तर जयपूरमध्ये ९३.८९ रुपये प्रति लिटर इतका दर आहे.

‘या’ शहरात शंभरी पार

देशातील सर्व महानगरातील पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, तमिलनाडू, कर्नाटक, जम्मू आणि कश्मीर, ओडिशा, केरळ, बिहार आदी ठिकाणी पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या वरती गेले आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा