पेट्रोल-डिझेल च्या किमती उतरल्या

मुंबई: आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे कच्च्या तेलांच्या किमातीत बराच वाढ झाली होती. याचा परिणाम भारतातील इंधनाच्या किमतीत झाला होता. परंतु सध्या तान तणावाचे वातावरण निवळले असल्याने तेलांच्या किमती उतरल्या आहेत. शनिवारी मुंबईत पेट्रोल प्रति लीटर ८०.२५ रुपये आहे तर डिझेलचा दर ७१.१५ रुपये आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलसाठी ग्राहकांना ७४.६५ रुपये मोजावे लागत असून डिझेलचा दर ६७.८६ रुपये आहे. बंगळूरमध्ये आजचा पेट्रोलचा दर ७७.१५ रुपये आहे. डिझेल ७०.१२ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ७७.५४ रुपये आणि डिझेल ७०.१२ रुपये आहे. हौद्राबादमध्ये पेट्रोल ७९.३८ रुपये असून डिझेल ७३.९९ रुपये आहे.

कमॉडिटी बाजारात खनिज तेलाचा भाव (यूएस क्रूड) ६३ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आहे. या कपातीनंतर पेट्रोल-डिझेल दराचा चालू महिन्यातील नीचांकी स्तर आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वादामुळे या तेलांच्या किमतीत वाढ झाली होती. इराण व अमेरिका याच्या वादाचा परिणाम पूर्ण जागतिक स्तरावर झाला होता. अस्थिरतेच्या या काळात इंधनाच्या किमती प्रचंड वाढल्या होत्या.

अमेरिकेच्या दबावामुळे भारताने इराणकडून कच्च्या तेलाची आयात बंद केली आहे. सध्या भारत सौदी अरेबिया व इतर देशांकडून तेलाची आयात करत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा