पेट्रोलच्या किमतीत पुन्हा वाढ

नवी दिल्ली, १७ फेब्रुवरी २०२१: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. बेंचमार्क क्रूड ऑईल ६३ डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले आहे. त्यामुळे देशात सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. देशातील अनेक ठिकाणी तेलांच्या किमतींनी शंभरी गाठली आहे. आज पुन्हा दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २५ पैशांनी वाढ झाली आहे. त्यानंतर दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत ८९.५४ रुपयांवर पोहोचली आहे आणि एक लिटर डिझेलची किंमत ७९.९५ रुपयांवर पोहोचली आहे.

यासह काही ठिकाणी कच्च्या तेलांच्या किमतींनी शंभरी गाठली आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली आहे. श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल प्रति लिटर १००.०७ रुपये दराने विकले जात आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलचे दर ९६ रुपयांवर पोहोचले आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९६ आणि डिझेलचे दर ८६.९७ रुपये आहेत.

इतर शहरांमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दररोज विक्रमी वाढ होताना दिसत आहे. बंगळूरमध्ये पेट्रोल ९२.४८ रुपये तर डिझेल ८४.७२ रुपये झाले आहे. चेन्नई मध्ये पेट्रोल ९१.७३ रुपये तर डिझेल ८५.०५ रुपये झाले आहे. तसेच कोलकाता मध्ये पेट्रोल ९०.८९ रुपये तर डिझेल ८३.५४ रुपये झाले आहे.

भारताला इंधनाची गरज भागवण्यासाठी ८० टक्के आयातीवर अवलंबून राहावे लागत आहे. केंद्र सरकार पेट्रोलवर प्रतिलिटर ३२.०९ रुपये आणि डिझेलवर ३१.८० रुपये उत्पादन शुल्क आकारत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा