फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी कॉलेज येथे माजी विद्यार्थी मेळावा कार्यक्रम संपन्न

फलटण, सातारा १८ नोव्हेंबर २०२३ : फलटणची भूमि पवित्र असून फलटण मध्ये असणारे कैलासवासी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या मुधोजी कॉलेज मध्ये आपण आज मला बोलवले, इथे बोलण्याचे भाग्य मिळाले असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. फलटण येथील फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी कॉलेज येथे माजी विद्यार्थी मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते.

श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचे महाराष्ट्राच्या जडण घडणीत मोठे योगदान आहे, फलटण संस्थान एक आदर्श संस्थान असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी केले. फलटणच्या प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्यां विचारांवर आपण वाटचाल करत असताना आपण तो विचार घेऊन फलटण च्या मुधोजी महाविद्यालयाचे नाव महाराष्ट्रात उंचावत ठेवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करण्याचे गरजेचे असल्याचे यावेळी आमदार दिपक चव्हाण यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दीपक चव्हाण हे होते. तसेच यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, डी.के.पवार, ज्येष्ठ वकील विश्वनाथ टाळकुटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक संजय दीक्षित यांनी तर प्राचार्य बी.एच.कदम यांनी आभार मानले कार्यक्रमास मोठ्या संख्येने प्राध्यापक माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार