फलटणची बॉक्सिंग सुवर्णकन्या देविकाचे फलटणनगरीमध्ये जंगी स्वागत

फलटण, ५ डिसेंबर २०२२ : फलटणची कन्या देविका सत्यजित घोरपडे हिने जागतिक युवा ऑलिंपिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आणि बॉक्सिंग खेळात स्वतःचे व फलटण शहराचे नाव उंचावले. यानिमित्त सुवर्णकन्या देविका घोरपडेचे फलटणकारांतर्फे ढोल-ताशा व झांज पथकाच्या वाद्यात प्रचंड गर्दीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.

फलटणची कन्या देविका सत्यजित घोरपडे हिने बॉक्सिंग क्षेत्रात जागतिक युवा ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये तिने सुवर्णपदक पटकाविले होते. फलटणच्या कन्येने सुवर्णपदक पटकाविल्याने फलटणकरांनी जल्लोष केला होता. नुकतेच सुवर्णकन्या देविकाचे फलटण शहरात आगमन झाल्यानंतर शुक्रवार पेठ तालीम मंडळ व समस्त फलटणकारांतर्फे फलटणच्या प्रमुख मार्गांवरून तिची मिरवणूक काढत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी शुक्रवार पेठ तालीम मंडळाच्या वतीने खास सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देविकाचे प्रशिक्षक मनोज पिंगळे, पी.एस.आय. गायकवाड मॅडम व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व फलटणकर मंडळींनी तिचे पुष्पहार देऊन स्वागत केले व तिला भावी खेळासाठी शुभेच्छा दिल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा