मुंबई, १० सप्टेंबर २०२२ : काही दिवसापासून याकूब मेमन च्या कबरीच्या सजावटीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. त्यामध्ये मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी याकूब मेमन चुलत भाऊ रऊफ मेमन सोबत एका बैठक घेतल्याचा आरोप भाजपकडून केला होता. तसेच शिवसेना आणि मेमनचे संबंध काय व त्यांची चौकशी करा असे देखील बोलले जात होते.
यावर भाजप नेते आणि रहू मेमन यांचे फोटो दाखवत पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. किशोरी पेडणेकर बोलतात मी महापौर असताना धार्मिक स्थळाच्या तक्रारी ऐकण्यासाठी गेले होते त्यावेळी बैठकीला कोण उपस्थित आहे. याची मला कल्पना नव्हती हा त्यावेळेस बैठक झालेला व्हिडिओ असेल आम्हाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचला जात आहे असं बोलत पेडणेकर यांनी पलटवार केला आहे.
यादरम्यान किशोरी पेडणेकर यांनी याकूब मेमनचा चुलत भाऊ रऊफ मेमन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेतल्याचा फोटो आणि व्हिडिओ दाखवत याबद्दल काय बोलनार असा उलट प्रश्न विचारला आहे.भाजपवर पलटवार करत मध्यमांसमोर फोटो आणि व्हिडीओ दाखवले आहेत. तसेच सामान्य घरातील लोकाना बदनाम करू नका अशी हाथ जोडून विनंती केली आहे. आरोप करणाऱ्या भाजपच्या बारा तोंडांनी या फोटोला कॅप्शन द्यावे असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. तर, काँग्रेसने रऊफ मेमन आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा फोटो ट्वीट केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे