फोटो टिळकांचा जयंती आगरकरांची, गोपीचंद पडळकरांचा कारनामा…

बारामती, १४ जुलै २०२० : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा सोशल मीडियात ट्रोल होऊ लागले आहेत.नेटिझन्स त्यांचा चांगलाच समाचार घेत असल्याचे दिसून आले.थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणाऱ्या पोस्टमध्ये त्यांनी आगरकरांच्या ऐवजी चक्क लोकमान्य टिळकांचाच फोटो वापरला त्यानंतर सोशल मीडियात याबाबत ट्रोल झाल्यानंतर त्यांनी हे ट्विट डिलीट करत दुसरा फोटो पोस्ट केला , यावरून ते सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ट्विटरवर घडलेल्या प्रकारामुळे सोशल मीडियात नेटिझन्सने त्यांना अक्षरश: ट्रोल केले आहे. नेटिझन्समुळे हा प्रकार समोर आल्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्यावर ट्विट डिलीट करण्याची नामुष्की ओढावली, लोकमान्य टिळकांचे नामकरण कधी झाले? फोटो टिळकांचा जयंती आगरकरांची अशा शब्दात नेटिझन्सने त्यांना ट्रोल केले आहे. यानंतर गोपीचंड पडळकर यांनी आगरकरांना अभिवादन करणारी पोस्ट टाकल्याचं दिसून आलं असं सांगण्यात आलं आहे.

मात्र सोशल मीडियातील या ट्रोलिंगवर आमदार गोपीचंद पडळकरांशी “मी माझ्या ट्विटरवर गोपाळ गणेश आगरकरांचा फोटो पोस्ट करत अभिवादन केले मात्र राष्ट्रवादीच्या लोकांकडून जाणुनबुजून अशाप्रकारे फोटो व्हायरल करण्यात येत आहेत असा आरोप पडळकरांनी करत आपण केलेल्या कृत्याची त्यांनी सारवासरव केली.

मात्र या पोस्टनंतर पडळकर नेटीझन्सच्या निशाण्यावर आल्याचे दिसून आले आहे.राष्ट्रवादीचे सर्व्हेसर्व्हा शरद पवारांवरिल टीकेवेळी सारावासरव करण्यासाठी भाजपचे प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी नेते देवेंद्र फडणवीस त्यांच्या बरोबर होते मात्र यावेळी त्यांनाच सारवासारव करावी लागत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा