गोल पोस्ट राजकारण उत्कृष्ट फोटोग्राफर ते मुख्यमंत्री

उत्कृष्ट फोटोग्राफर ते मुख्यमंत्री

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिवतीर्थावर हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. आजवरचा उद्धव ठाकरे जीवन परिचय आणि राजकीय प्रवास सर्वाना माहीत आहेच.पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, त्यांच्या आवडी-निवडीबद्दल फार कमीच वाचले किंवा ऐकले असेल. नवीन मुख्यमंत्र्यांबद्दल आज नवीन काही गोष्टी समजून घेऊ या….

ठाकरे घरातील पहिले मुख्यमंत्री
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ते चिरंजीव. ठाकरे कुटुंबातील पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान उद्धव ठाकरे यांना मिळाला. १९९५ साली शिवसेनेचे मनोहर जोशी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळला होता . त्यानंतर पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील उद्धव यांना ही संधी मिळाली आहे. याशिवाय बाळासाहेब यांचे नातू आदित्य ठाकरेंनी देखील पहिल्यांदा आमदार म्हणून शपथ घेतली.

फोटोग्राफीची आवड
उद्धव ठाकरे यांना फोटोग्राफीची खूप आवड आहे. रिकाम्या वेळेत त्यांना फोटोग्राफी करताना अनेक वेळा पाहिले आहे . त्यांना एरीयल फोटोग्राफीची आवड आहे . अनेकदा त्यांनी हॅलिकॉप्टरमधून फोटोग्राफी केली आहे. याच नादात ते एकदा हॅलिकॉप्टरमधून पडणार देखील होते.वारी दरम्यान त्यांनी अनेकदा वाइल्ड फोटोग्राफी देखील केली आहे.

२८ किल्ल्यांची फोटोग्राफी
उद्धव ठाकरे यांनी२००४ साली हॅलिकॉप्टरमधून १० दिवस फिरत ४० तास फोटोग्राफी केली होती. यात त्यांनी २८ किल्ल्यांचे एरीयल फोटो घेतले होते . २८ किल्ल्यांचे ४ हजार ५०० हून अधिक फोटो त्यांनी काढले होते . २००४ मध्ये या फोटोंचं जहांगीर आर्ट इथं प्रदर्शन भरवले होते .

झिरो डिग्री फोटोग्राफी
उद्धव ठाकरे यांना फोटोग्राफीची एवढी आवड आहे की ते ० डिग्री फोटोग्राफी पण करतात. २००८ साली त्यांनी कॅनडातील हटसनवेमध्ये पोलर बेयरचे फोटो काढले. त्यावेळी तिथले तापमान ० डिग्री होते . याशिवाय त्यांची दोन फोटो पुस्तकं देखील प्रकाशित झाली आहेत. पहिल्या पुस्तकाचं नाव महाराष्ट्र देश (२०१०) आणि दुसऱ्या पुस्तकाचं नाव पाहावा विठ्ठल (२०११) आहे .

१९९१ साली शिवसेनेच्या मंचावर पाऊल
उद्धव ठाकरे यांनी खूप आधीपासून शिवसेनेत काम करण्यास सुरुवात केली होती . पण १९९१ साली त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेच्या मंचावर पाऊल ठेवलं . १९९१ नंतर ते पक्षाच्या कामात अधिक सक्रीय झाले .

२००२ साली बीएमसीची जबाबदारी
दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी २००२ सालच्या पालिका निवडणुकीची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर सोपवली होती . या निवडणुकीत शिवसेनेला विजय मिळाला होता . त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावरील जबाबदाऱ्या अधिक वाढल्या . २००३ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना शिवसेनेचा कार्यकारी अध्यक्ष बनवले.

आज त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज ठाकरे घराण्याने एक ऐतिहासिक क्षण अनुभवला असल्याचे समोर आले.

error: Content is protected !!
Exit mobile version