पुणे, ३१ डिसेंबर २०२०: महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातून अत्यंत घृणास्पद आणि माणसातील वाईट विकृतीचे चेहरे समाजा समोर आले आहेत. ज्यामुळे माणुसकी राहीली आहे की नाही?हा प्रश्न सतत ऐरणीवर आला आहे. आजच्या आधुनिक काळात ही घरातील आई, बहिण, मुलगी, स्त्री आज सुरक्षित नाही. ही गोष्टच मुळात लाजिरवाणी झाली आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचे फोटो काढल्याची धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यात घडली आसून संपूर्ण तालुकाच हादरला आहे. तांबे या पश्चिम पट्ट्यातील, आदिवासी समाजातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या कारणावरून तीन युवकांवर पॉस्को अर्थात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक आणि अनुचित जाती जमाती अत्याचार कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक नराधम फरार आहे.
तांबे गावानं बिरसा ब्रिगेडची दहशत अनुभवल्याचंही बोललं जातं आणि या घटनेनंतर आदिवासी समाज संघटना बिरसा ब्रिगेड आक्रमक झाल्याचेही समजले आहे. बिरसा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रात्रभर आंदोलन केलं. या दरम्यान, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सौरभ भगवान वाळूंज, आदित्य गुलाब कबाडी या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर करण शिवाजी वाळूंज हा आरोपी घटनेनंतर फरार झाला आहे.तिन्ही आरोपी तांबे गावातीलच आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव