शहापूर येथे पिकअप व कंटेनरची समोरासमोर धडक; अपघातात एक जण ठार…

शहापुर, १४ मार्च २०२४ : अंबड तालुक्यातील शहापूर येथे अंबड – वडीगोद्री राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल सांयकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.

अंबडकडून वडिगोद्रीच्या दिशेने जाणारे पिकअप आणि वडिगोद्रीकडून अंबडच्या दिशेने जाणारे कंटेनर (टँकर) या दोन वाहनांची जोरदार धडक झाली. यात पिकअप चालक नारायण परदेशी हे पाथरवाला बुद्रुक येथील रहिवासी असून ते गंभीर जखमी झाले आहे.

ही धडक एवढी जोरदार होती की पिकअपच्या समोरील भागाचा अक्षरशः चुरडा झाला आहे. उपस्थितांनी जखमींना तात्काळ खाजगी वाहनाने अंबड रुग्णालयात उपचारासाठी हलवले. पण उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्ग ७५३ वरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. गोंदी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने उपस्थितांच्या साहाय्याने बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा