शेअर बाजारात ८ ते २५ टक्के नफ्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ६३ लाख ९३ हजारांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी कुशल तपास करून बेड्या ठोकल्या आहेत. प्रथमेश शिवाजी भुसे (२३) आणि सचिन राधाकिसन मोरे (३४) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तक्रारदाराचे पैसे ज्या बँक खात्यात जमा झाले होते, ते ‘मातोश्री पॅथॉलॉजी लॅबोरेटरी’च्या नावाने होते.
या खात्याची केवायसी प्रथमेश भुसे याच्या नावाने असल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी त्याला व त्याचा साथीदार सचिन मोरे याला ताब्यात घेतले. धक्कादायक म्हणजे, या संशयितांच्या बँक खात्यावरून १ कोटी १५ लाख रुपयांचे व्यवहार झाले असून, याप्रकरणी विविध राज्यांमध्ये १० तक्रारी दाखल आहेत. सायबर पोलिसांनी केलेल्या या कौशल्यावरक तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे










































