पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडील जप्त अंमली पदार्थांचा नाश

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडील जप्त केलेला २३ कोटी ३० लाख रुपयांचा अंमली पदार्थ रांजणगाव येथील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लि. या कंपनीच्या भट्टीमध्ये नाश करण्यात आला. त्यामध्ये ३ कोटी ३१ लाख २२ हजार ७५० रुपयांचा ६६२ किलो गांजा व १९ कोटी ९९ लाख ७० हजार रुपयांचा १९ किलो मॅफेड्रोन यांचा समावेश होता.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक अंमली पदार्थ नाश समितीचे अध्यक्ष सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त श्र्वेता खेडकर, संदीप आटोळे, डॉ. शिवाजी पवार यांच्या परवानगीने २९ सप्टेंबर २०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक, पिंपरी चिंचवड प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, राज्य उत्पादन शुल्क, पुणे व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांचे प्रतिनिधी रांजणगाव एम आय डी सी येथील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लि. येथे प्रत्यक्ष हजर राहून भट्टीमध्ये ९० गुन्ह्यातील अंमली पदार्थ जाळून नाश केले.

ही कार्यवाही पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त श्र्वेता खेडकर, संदीप आटोळे, डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल चव्हाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक शकुर तांबोळी, स्वामीनाथ जाधव, पोलीस हवालदार शिल्पा कांबळे, ज्ञानेश्वर मुळे, प्रसाद कलाटे, निखिल शेटे, संतोष स्वामी, पोलीस अंमलदार रणधीर माने, कपिलेश इगवे, मितेश यादव, सुभाष गुरव, संतोष सपकाळ, चंद्रकांत जाधव, चितांमणी सुपे यांनी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील