पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची आगामी निवडणूक आता अधिकच रोमांचक होणार आहे. कारण गेल्या आठ वर्षांत शहरात तब्बल ५ लाख १६ हजार ६९८ नवीन मतदारांची वाढ झाली आहे. २०१७ मध्ये ११ लाख ९२ हजार ८९ असलेली मतदारसंख्या आता १७ लाख ८ हजार ७८७ वर पोहोचली आहे. शहराची वेगाने होणारी लोकसंख्या वाढ आणि नवीन मतदारांचा उत्साह ही या वाढीमागील प्रमुख कारणे आहेत.
विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर, चिंचवडमध्ये सर्वाधिक ६,७९,८५८ मतदार असून, त्या खालोखाल भोसरीमध्ये ६,२९,१२९ आणि पिंपरीमध्ये ३,९९,८०० मतदार आहेत. महापालिकेची प्रभाग रचना अंतिम टप्प्यात असून, लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. या मोठ्या मतदार संख्येमुळे उमेदवारांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे, ज्यामुळे ही निवडणूक अधिकच चुरशीची होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे












































