गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पिंपरी-चिंचवडमध्ये लिफ्टमध्ये अडकून ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू; सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न

पिंपरी-चिंचवडमध्ये लिफ्टमध्ये अडकून ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू; सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न

पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. राम स्मृती सोसायटीतील ११ वर्षाच्या मुलाचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला. खेळताना तो चुकून लिफ्टजवळ गेला असता अचानक दरवाजा बंद झाला आणि तो त्यात अडकला.

या दुर्घटनेनंतर लगेचच त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सोसायटीतील नागरिक हादरले असून, लिफ्ट सुरक्षेबाबत मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी या प्रकारानंतर सोसायटी आणि इमारतींमधील लिफ्टची नियमित तपासणी व देखभाल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला असून, लिफ्ट सुरक्षेतील त्रुटींची चौकशी केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी साक्षी पांचाळ

error: Content is protected !!
Exit mobile version