पिंपरी-चिंचवड महापालिकेत तब्बल २२७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एकाच वेळी पदोन्नती देण्यात आल्याने दिवाळीपूर्वीच जल्लोष सुरू झाला आहे. प्रशासक शेखर सिंह यांनी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.
🔹 चार सहायक आयुक्त आणि मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी यांचाही पदोन्नतीच्या यादीत समावेश
🔹 उपअभियंता, कार्यालय अधीक्षक, मुख्य लिपिक यांसारख्या विविध पदांवरील कर्मचाऱ्यांना लाभ
🔹 गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट असल्यामुळे पदोन्नती प्रक्रिया जलद पार पडली
या निर्णयामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून, हा निर्णय “दिवाळी धमाका” ठरल्याचं बोललं जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : चंद्रशेखर रहांगडाले












































