पिंपरी चिंचवड: महापालिकेने २०१६ मध्ये १३ यंत्रे, तर जून २०१८ मध्ये चार यंत्रे खरेदी केली. प्रत्येकी दोन लाख रुपये किंमत असणाऱ्या या यंत्रांच्या दुरुस्तीची जबाबदारी वर्षभर संबंधित कंपनीवर होती. मात्र, सध्या ही सर्व यंत्रे बंद पडली आहेत. आरोग्य विभागाकडे कुशल तंत्रज्ञ नसल्याने डास मारण्यासाठीची ही १७ यंत्रे दुरुस्तीअभावी धूळ खात पडली आहेत. ती दुरुस्त न करता आणखी २५ यंत्रे खरेदीचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे पालिकेच्या पैशांचा अपव्यय होणार आहे.
“पालिकेने जुनी यंत्रे दुरुस्त करावीत. त्यानंतरच नवीन यंत्रे खरेदी करावीत. जनतेच्या कररूपी पैशांचा योग्य वापर व्हावा,’’ अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते वसंत रेंगडे यांनी केली आहे.