“दिल्लीच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांवर कठोर कारवाईची मागणी; ९ वर्षांत १.२६ लाख नागरिकांना चावा”

“On Delhi’s lines, demand for strict action against stray dogs in Pimpri-Chinchwad; 1.26 lakh people bitten in 9 years”

दिल्ली-एनसीआरमध्ये भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर आदेश लागल्यानंतर, पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनीही आता अशाच कारवाईची जोरदार मागणी सुरू केली आहे.
शहरातील रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढणारे कुत्र्यांचे टोळके, अचानक हल्ले आणि चावण्याच्या घटनांनी नागरिकांचा जीव अक्षरशः हैराण झाला आहे.

आकडेवारी धक्कादायक – गेल्या ९ वर्षांत भटक्या कुत्र्यांनी तब्बल १,२६,१७६ नागरिकांना चावा घेतला आहे.
महापालिकेची नसबंदी मोहीम कोलमडल्याने कुत्र्यांची संख्या आटोक्यात न येता उलट वाढतच आहे.
संसाधनांचा तुटवडा, कामातील सातत्याचा अभाव आणि गतवर्षी आर्थिक अडचणींमुळे मोफत नसबंदी थांबल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.

रेबीज लसींसाठी रांगा, नागरिक त्रस्त – YCM रुग्णालयात मोफत लसी दिल्या जात असल्या तरी वाढत्या रुग्णसंख्येमुळे तिथे प्रचंड गर्दी आहे.
लसीकरण, टॅगिंग आणि हेल्पलाइन सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न पुरेसा ठरत नाहीये.

जनतेची मागणी स्पष्ट – दिल्लीच्या पद्धतीवर भटके कुत्रे पकडून आश्रयस्थळात ठेवावेत, हा प्रश्न कायमचा मिटवावा!
पण महापालिका अजूनही न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत आहे.

नागरिकांचा थेट सवाल – आदेशाची वाट पाहत बसण्यापेक्षा महापालिका कधी पुढाकार घेणार? की आणखी किती लोकांना चावले जाईल तेव्हाच कारवाई होणार?

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे